Thibak Sinchan Yojana 2023: शेतकऱ्यांनो, आपण शेताला पाणी देतो. त्यावेळेस पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही. कारण, शेताला पाणी दांडानी देतो. पाणी वाटेतच जमिनीमध्ये मुरते आणि पाण्याची नासाडी होऊन पाणी वाया जाते. त्यामुळे पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही. पिकाला पाणी देण्याच्या पद्धतीमुळे पाण्याचा साठा कमी व्हायचा. परंतु आता सर्व शेतकरी ठिबक सिंचनच पद्धतीने शेतामध्ये शेत पिकाला पाणी देतात. ठिबक सिंचनामुळे पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळते.
सर्व शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाच्या पद्धतीने पाणी देणे शक्य होत नाही. यामागील कारण म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देता येत नाही. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन शेतामध्ये बसवायचे असेल तर त्यांना भांडवलीची गरज लागते. शेतकऱ्यांना योग्य ती भांडवल मिळत नाही त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून ठिबक सिंचन योजनेअंतर्गत 90% अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा