Soybean Machinery Subsidy: सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज
- सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर खरेदी करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या कागदपत्रांचे प्रति एक झेरॉक्स काढावेत आणि आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती याठिकाणी संबंधित कागदपत्रे व अर्जाचा नमुना दाखल करावा.
- शेतकऱ्यांनो तुम्ही अर्ज दाखल करा अर्ज दाखल केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड झाल्यास पुढील फक्त एक ते दोन महिन्यात लाभार्थ्यांची निवड होते.
- त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातील दुकानातून टोकन यंत्र खरेदी करून त्याबद्दलची सर्व कागदपत्रे जमा करावीत.
सोयाबीन टोकन यंत्रासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालील प्रमाणे
▪बँक पासबुक झेरॉक्स
▪ आधार कार्ड
▪सातबारा आणि आठ अ उतारा
▪जात प्रमाणपत्र झेरॉक्स
▪ जर अर्जदार अपंग असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र
सोयाबीन टोकण यंत्र घेण्यासाठी अर्ज कसा व कोठे करायचा ते आपण इथे पाहणार आहोत.
अर्ज करण्यासाठी वरी दिलेली सर्व कागदपत्रे आपल्या जवळ असणे आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढून घ्यावी लागेल आणि नंतर तुमच्या जवळ असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालयात जाऊन सोयाबीन टोकण यंत्राचा अर्ज घ्यायचा आहे. तिथे गेल्यानंतर तो अर्ज भरावा. आणि नंतर भरलेला अर्ज व त्याबरोबर वरील कागदपत्रे जोडून ते संबंधित कार्यालयात द्यायचे आहेत.Soybean Machinery Subsidy