Jan Dhan Scheme: या योजनेचे जनधन खातेधारकांना नेमके कोणते फायदे होतात

Jan Dhan Scheme: आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेलीच आहे त्याचबरोबर या योजनेचे नेमके जनधन खातेधारकांना कोणकोणते फायदे होतात ते आपण इथे पाहणार आहोत. पीएम जनधन खातेधारकांना या योजनेअंतर्गत बरेचसे फायदे मिळत आहेत. आपण पाहतो की जनधन खातेदारांना ठेवींवर व्याज मिळते त्याचबरोबर 1 लाख अपघात विमा संरक्षण देखील दिले जाते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य बघायचे म्हणलं तर ते म्हणजेच या योजनेमध्ये किमान पैसे शिल्लक ठेवण्याची कोणतीही अडचण नाही. 10,000 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा सुद्धा या योजनेअंतर्गत दिली जाते.

आपल्याला जर खाते खोलायचे असेल तर आपणही खाते उघडू शकता या योजनेअंतर्गत देशातील कोणताही नागरिक आपले खाते उघडू शकतो यासाठी फक्त तुमच्या वयाची अट आहे ती म्हणजे तुमचे वय किमान 10 वर्ष असणे आवश्यक आहे. तुम्हाला जर हे जनधन चे खाते कोणत्याही बँकेत उघडायचे असतील तर तुमचे वय 10 वर्ष असणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!