Hawamaan Andaaz Maharashtra: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सिंधुदुर्ग, बीड या सात जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता असून या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट देखील जारी केले आहे.
परंतु त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. ती म्हणजे आता उद्यापासून निसर्ग स्थिर होईल. यामुळे उद्यापासून पाऊस कमी होणार आहे.