FREE TRAVEL TO ST: सरकारच्या या योजनेअंतर्गत 75 वर्षावरील ज्येष्ठ सर्व नागरिकांना मोफत प्रवास दिला जाणार आहे. त्याचबरोबर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन मंडळाच्या बस मध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेऊन मोफत एसटीचा प्रवास करण्यासाठी 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कोणत्याही एक ओळखपत्र वाहन काला(कंडक्टर ला) दाखवल्यास मोफत एसटीचा प्रवास दिला जाईल.
एसटीचा मोफत प्रवास करण्यासाठी तुमच्यापाशी वरील पैकी एक तरी कागदपत्रे जवळ असणे अत्यंत गरजेचे आहे.